सश्रद्ध तत्त्ववाद्यांच्या कूळधर्माचा मी. पण माझ्या श्रद्धा या माझ्याच आहेत.
रशियन तत्त्ववेत्ता निकोलस बर्दिएव्ह याच्याबद्दल त्र्यं.वि. सरदेशमुख यांना फार सख्यत्व वाटे. त्यांच्या साहित्यात बर्दिएव्हच्या विचारांचे उल्लेख अनेकवार येतात. ‘अधिभौतिक मार्गावरचे अध्यात्म’ हा त्यांना जोडणारा धागा होता. बर्दिएव्हचाचा आज १४५ वा जन्मदिवस. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांचे कृतज्ञ स्मरण.......